Ad will apear here
Next
सिद्धार्थ शिरोळे करणार ‘ग्लोबल मास ट्रान्झिट’मध्ये सादरीकरण
सिद्धार्थ शिरोळेपुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांना सिंगापूर येथे होणाऱ्या प्रतिष्ठीत अशा ग्लोबल मास ट्रान्झिटमध्ये सादरीकरण करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. सिंगापूर येथे येत्या २२ व २३ ऑक्टोबर दरम्यान ही परिषद होणार असून, परिषदेत ‘क्लीन बसेस इन सिटीज इन एशिया पॅसिफिक’ या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.

एशिया पॅसिफिक खंडामध्ये सार्वजनिक वाहतुककोंडी, अपघात, प्रदूषण यांची समस्या गंभीर आहे. या प्रश्नावर उपाय म्हणून स्वच्छ बसेसची आवश्यकता आहे. या अंतर्गत सीएनजी, इलेक्ट्रिक, हायड्रोजन व हायब्रीड बसेसची संख्या वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याबरोबरच या विषयात ज्या सार्वजनिक, खासगी संस्थांनी भरीव कामगिरी केली आहे, त्यांना त्यांचे अनुभव व त्यांनी केलेले प्रयोग मांडता यावेत, यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

या परिषदेमध्ये पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक व पुणे महानगर परिवहन महामंडळाचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांना आपले विचार मांडण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे, ही शहराच्या दृष्टीने एक महत्त्वाची बाब आहे. पुणे महापालिकेच्या सेवेत दाखल होत असलेल्या इलेक्ट्रिक बसेस, महापालिकेच्या इमारतींवर बसविण्यात आलेले पवन, सौर हायब्रीड उर्जा प्रकल्प याबद्दल ते माहिती देतील. याबरोबरच या परिषदेमध्ये सध्या या क्षेत्रातील चालू घडामोडी, संधी आणि समस्या यांचा आढावादेखील सहभागी होणाऱ्यांना घेता येणार आहे.  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZOOBT
Similar Posts
‘ग्लोबल मास ट्रान्सिट’मध्ये शिरोळे यांचे क्लीन बसेसवर सादरीकरण पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे संचालक सिद्धार्थ शिरोळे नुकत्याच सिंगापूर येथे झालेल्या ‘ग्लोबल मास ट्रान्सिट’मध्ये क्लीन बसेसबाबत महाराष्ट्राचे धोरण स्पष्ट केले. या परिषदेत ‘क्लीन बसेस इन सिटीज इन एशिया पॅसिफिक’ या विषयावर चर्चा करण्यात आली. या वेळी सिद्धार्थ शिरोळे यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे
महिला प्रवाशांसाठी विशेष सहा बसेस दाखल पुणे : महाराष्ट्र सरकारच्या तेजस्विनी योजनेअंतर्गत खास महिला प्रवाशांसाठी टाटा मोटर्स कंपनीने तयार केलेल्या अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज सहा अल्ट्रा नाईन एम डिझेल मिडी बसेस पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल)च्या ताफ्यात दाखल करण्यात आल्या आहेत. मार्च २०१९ पर्यंत टप्प्याटप्प्याने आणखी २७ बसेस दाखल होणार आहेत
तीन लाखांपेक्षा कमी किंमतीतील ‘क्यूट’ अखेर दाखल पुणे : देशातील पहिले ‘क्वाड्रीसायकल’ वाहन ‘क्यूट’अखेर महाराष्ट्रातही दाखल झाले आहे. सहा वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर तीन लाखांपेक्षा कमी किंमतीतले हे अनोखे वाहन देशात दाखल करण्यात बजाज ऑटोला यश आले आहे. नुकतेच पुण्यात हे वाहन सादर करण्यात आले. या वेळी कंपनीच्या शहरांतर्गत वाहतूक व्यवसाय विभागाचे महाव्यवस्थापक
पुण्यात लवकरच धावणार २५ एसी इलेक्ट्रिक बस पुणे : ‘पुणेकरांसाठी सार्वजनिक वाहतुकीचा सर्वांत महत्त्वाचा भाग असलेल्या ‘पीएमपीएमएल’च्या ताफ्यात २६ जानेवारी रोजी २५ एसी इलेक्ट्रिक बस समाविष्ट होणार आहेत.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language